मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र...
आपण पत्रात माझ्या ‘हिंदुत्वा’चा जो उल्लेख केला आहे, तो योग्यच आहे. मात्र माझ्या ‘हिंदुत्वा’ला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. ‘Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated?’ असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे ‘हिंदुत्व’ आणि न उघडणे म्हणजे ‘Secular’ असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत, त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का?.......